VIDEO - सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता म्हणजे शंकर पवार; राऊतांकडून नाव उघड
मुंबई, ७ जून: सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.
सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ‘सोनू सूदला मदत करणाऱ्या यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार ही व्यक्ती आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. सूद हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत आहे,’ असा दावा राऊत यांनी केला आहे.
विशेष म्हणजे बंजारा राष्ट्रीय सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांचे मोदींसोबत देखील फोटो प्रसिद्ध झाले आहेत. अगदी ११ मे २०२० रोजी परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात बसने मार्गस्त करण्यात आले तेव्हा देखील शंकर पवार हे सोनू सूदसोबत खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत आणि त्याचे विशेष व्हिडिओ रेकॉडिंग बंजारा समाजाच्या स्थानिक वृत्तवाहिनीने केले होते.
एकूण भाजपने अक्षय कुमारच्याबाबतीत जशी रणनीती आखली आणि त्याला थेट भावनिक गोष्टींशी जोडून निवडणुकीत पीआर मॅनेजमेंटने फायदा करून घेतला होता. तसाच सोनू सूदचा प्रवास सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रोजंदारीवर जगणारा कामगार थेट ट्विटरवरून सोनू सुदशी संपर्क करू लागल्याने आणि त्याच्या बातम्या पसरू लागल्याने एक वेगळीच टीम त्याच्यासाठी समाज माध्यमांवर काम करत असल्याचं मार्केटिंग तज्ञांनी म्हटलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शंकर पवार यांचा मुलगा सनी पवार २०१७ मध्ये ठाण्यातून पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देखील होते. त्यामुळे आगामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सोनू सूदचा संपूर्ण विषय समोर येईल असं देखील मार्केटिंग आणि पीआर मॅनेजमेंट तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
सोनू सूदसोबत असणारे बंजारा राष्ट्रीय सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांचा मुलगा सनी पवार २०१७ मध्ये ठाण्यातून पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देखील होते. आगामी बिहार – युपी विधानसभा निवडणुकीत सोनू सूदचा संपूर्ण विषय समोर येईल असं देखील पीआर मॅनेजमेंट तज्ज्ञांनी म्हटलं आहे. pic.twitter.com/jhycbPWFLO
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) June 7, 2020
News English Summary: Sunny Pawar, son of Banjara Rashtriya Seva Sangha president Shankar Pawar, who was with Sonu Sood, was also a BJP candidate in the 2017 municipal elections from Thane. PR management experts have also said that the entire issue of Sonu Sood will come up in the upcoming Bihar-UP Assembly elections.
News English Title: Political connections between Banjara Rashtriya Seva Sangh National President Shankar Pawar and Sonu Sood News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो