भाजपाची धडपड व्यर्थ, दोन दिवसांत विधान परिषद निवडणूक जाहीर होणार
मुंबई, १ मे: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात कितीही मतभेद असले तरी येथील राजकीय पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून केंद्रातूनच सूत्र हलल्याने येत्या दोन दिवसांत या जागांसाठी निवडणूक जाहीर होणार असल्याचे कळते. सुरक्षित वावर आणि इतर सर्व नियम पाळून २० ते २२ मे पूर्वी या निवडणुका पार पडतील आणि राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा अस्थिर खेळ थांबेल असं म्हटलं जातं.
(ईसीआय) महाराष्ट्रातील विधान परिषद (एमएलसी) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र या निवडणुकांदरम्यान कोरोनाचा विचार करता सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Election Commission of India (ECI) grants permission for holding elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra. The necessary guidelines will need to be ensured for safety against #COVID19 during the elections pic.twitter.com/teikSwVdyi
— ANI (@ANI) May 1, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा मोदी, शहा यांच्याशी संपर्क साधल्यानंतर राज्यपालनियुक्त जागेचा विचार सोडून विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका हाच मार्ग असल्याने या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे कळते.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येत्या २८ मेपर्यंत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने हा राजकीय पेच निर्माण झाला होता.
News English Summary: Whatever the differences between the Maharashtra Vikas Aghadi government and the BJP in the state, Prime Minister Narendra Modi, Home Minister Amit Shah and Chief Minister Uddhav Thackeray have agreed to resolve the political stalemate here. Accordingly, a request has been made to the Election Commission to hold elections for 9 seats in the Legislative Council and it is learned that the election for these seats will be declared in the next two days as the formula has been shifted from the Center.
News English Title: Political dilemma is over national election commission may announce legislative council election in Maharashtra State MLC CM Uddhav Thackeray News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today