पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | राठोड यांच्या अडचणीत वाढ? | मुख्यमंत्र्यांकडून बोलावणं
मुंबई, १३ फेब्रुवारी: बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची पावले उचलण्याची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडण्यासाठी बोलावून घेतलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दुसरीकडे पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसांत समोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास १० ते ११ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. काही फोटो समोर आले आहेत. या सगळ्या गोष्टींमधून तिला आत्महत्येसाठी परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण तिचा मोबाइल ताब्यात घे असं सांगताना मंत्री दिसत आहेत. पोलीस याबद्दल अजूनही स्पष्टता देत नाहीत,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has started taking important steps in the Pooja Chavan suicide case. Sources have said that the Chief Minister has taken all the information about the Pooja suicide case. He has also been summoned by the Chief Minister to present his case. Therefore, the possibility of action being taken against Shiv Sena Minister Sanjay Rathore at any moment has increased and will Rathore stay or go? Such a discussion is rife in political circles.
News English Title: Pooja Chavan suicide case Shivsena minister Sanjay Rathod in focus news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा