पूजाचा लॅपटॉप भाजपच्या नगरसेवकाने गायब करून चित्रा वाघ यांना माहिती पुरवली | बीडमध्ये तक्रार
बीड, ०४ मार्च: मागील काही दिवसांपासून राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचे नाव देखील समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे.
सदर तक्रारीत म्हटले आहे की, धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप चोरुन त्यातील माहिती चित्रा वाघ यांना दिली आहे. नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरला. मात्र आता हा नगरसेवक गायब झाला असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे.
पूजा चव्हाण, संजय राठोड यांच्या निवडणुकीचं कॅम्पेन करत होती, अशी माहिती मिळालीय. आणि त्याच प्रकारचे व्हिडीओही पूजाच्या लॅपटॉपमधूनच समोर आलेत. संजय राठोड मतदारसंघात फिरत असल्याचे, नागरिकांशी संवाद साधत असल्याचे फोटो आणि व्हिज्युवल्स घेऊन राठोडांचे व्हिडीओ तयार करण्यात आलेत.
पूजा ज्या इमारतीवरुन पडली त्यासमोरच राहतो नगरसेवक:
पूजा चव्हाणने पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याच इमारती समोर नगरसेवक धनराज घोगरे यांचे घर आहे. पूजाला दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा लॅपटॉप गायब झाला. दरम्यान भाजप नगरसेवकानेच पूजाचा लॅपटॉप गायब केला असल्याचा आरोप आहे.
भाजपच्या महिला पदाधिकारी चित्रा वाघ यांच्याविरोधात देखील तक्रार:
धनराज घोगरे या नगरसेवकाने लॅपटॉप मधील माहिती चोरून ती चित्रा वाघ दिली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या विरोधात देखील संगीता चव्हाणांकडून तक्रार देण्यात आली आहे. या लॅपटॉपमधून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. पुणे पोलिसांनी देखील पूजाचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा आणि आपण त्याचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे.
News English Summary: For the last few days, politics has been heating up across the state over the Pooja Chavan case. Now there is a new twist in this case. The name of a Bharatiya Janata Party corporator has also come to the fore in the Pooja Chavan death case. Bharatiya Janata Party’s Wanwadi corporator Dhanraj Ghogre has been accused of missing Pooja’s laptop. Shiv Sena’s Beed district women’s front chief Sangeeta Chavan has lodged such a complaint with Beed police.
News English Title: Pooja Rathod laptop stolen by BJP Pune corporator Dhanraj Ghogre news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल