22 January 2025 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

१५ दिवसांचा इशारा: पीकविमा कंपन्यांना दम देऊन काहीच न झाल्याने सेनेचे खासदार मोदींकडे

Farmers, Shivsena, Ishara Morcha, Crop Insurance Companies, Pradhanmantri Crop Insurance

मुंबई : मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले होते.

याच पीक कंपन्यांची कार्यालयं मुंबईमध्ये पहिल्यापासून असून देखील शिवसेनेला नेमका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा पुळका आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला. बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून मोर्चाला सुरुवात झाली होती जो थेट विमा कंपन्यांवर हा मोर्चा धडकला होता. उद्धव ठाकरे यांनी साबंधित ठिकाणी जाहीर सभाही घेतली. मात्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं हसू होईल अशी एक घटना घडली होती. मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या खाजगी विमा कंपनीवर मोर्चा काढला आणि १५ दिवसात पैसे न दिल्यास शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता.

दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तक्रारी या खरीप विमा कंपनीच्या बाबतीत होत्या. करणं पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. मात्र शिवसेनेने ज्या कंपनीवर धडक मोर्चा घेऊन जाण्याचं नाटक केलं ती कंपनी केवळ ‘रब्बी हंगामासाठी’च भरपाई देते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वाखाली त्यांना दम देऊन आले, ज्यांचा खरीप पिकाच्या भरपाईशी कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे शिवसेनेने मोर्चा काढण्यापूर्वी किती अभ्यास केला होता त्याचा प्रत्यय आला होता. तसेच शिवसेना नैर्तृत्वाला शेतीमधील काहीच कळत नसल्याची आयती संधी विरोधकांना मिळाली होती.

इशारा मोर्चा काढून देखील राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान विमा योजनेंतर्गत मिळणाऱ्या नुकसानभरपाईची विमा रक्कम देण्यात विमा कंपन्या टाळाटाळ करत आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्येचे तातडीने निराकरण करावे, अशी विनंती शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली.

राज्यांतील शेतकऱ्यांनी पंतप्रधान विमा योजनेंतर्गत विमा हप्त्यांची रक्कम केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या खासगी विमा कंपन्यांकडे भरली आहे. परंतु विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात दिरंगाई होत आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांना अधिक होत असून ही समस्या तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे शिवसेनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मुद्दय़ावर पंतप्रधानांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी दिली.

पुणे, नशिक, परभणी, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती, हिंगोली, वाशीम, भंडारा, चंद्रपूर, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, सातारा, यवतमाळ, सोलापूर, लातूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सांगली आणि वर्धा या जिल्ह्य़ांमधील शेतकऱ्यांनी खासगी विमा कंपन्यांमध्ये विम्याच्या हप्त्याची रक्कम जमा केली होती. मात्र या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना काही लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम वेळेवर दिली गेलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच, नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी विनंती पंतप्रधानांना करण्यात आल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x