24 November 2024 9:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

एक राजा बिनडोक तर दुसऱ्या राजांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, MP Udaynraje Bhonsale, Chhatrpati Sambhajiraje

मुंबई, ८ ऑक्टोबर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत “एक राजा बिनडोक आहे,” असं आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही राजाने नेतृत्व करावे, अशी मागणी होत आहे. त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. “दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचं मला दिसतंय. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून भाजपानं राज्यसभेवर कसे पाठवले? असा प्रश्न पडत आहे,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. “मी कोणालाही अंगावर घेण्यास घाबरत नाही,” असंही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना MPSC परीक्षा घेऊन नयेत अशी मराठा संघटनांची मागणी आहे (MPSC Prelim Exam 2020). या संदर्भात गुरूवारी (8 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मेटे यांनी रात्री उशीरा मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रश्नावर सगळ्यांच्या भावना तीव्र असून त्या समजूनच निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचंही मेटे यांनी सांगितलं.

 

News English Summary: Vanchit Bahujan Aghadi has declared its support to the Maratha community’s morcha demanding Maratha reservation. Prakash Ambedkar, president of the Vanchit Bahujan Alliance, announced this in Pune. While making this announcement, Prakash Ambedkar criticized Chhatrapati Udayan Raje Bhosale. Avoiding naming MP Udayan Raje, Ambedkar said, “One king is Bindok.

News English Title: Prakash Ambedkar criticized MP Udaynraje Bhosale and Chhatrpati Sambhajiraje over Maratha Reservation issue Marathi News LIVE latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x