22 December 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

नैसर्गिक आपत्तीतही पंतप्रधांना केवळ गुजरातच दिसतोय, ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत असंच दिसतंय

Tauktae cyclone

मुंबई, १९ मे | अरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.

या पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील तातडीच्या मदत कार्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्यातील नुकसानीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकार एक आंतर-मंत्रालयीन पथक देखील राज्य दौर्‍यासाठी तैनात करणार आहे. त्याचबरोबर वादळात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुबीयांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत करण्यात येणार आहे.

दरम्यान, चक्रीवादळाचा फटका ४-५ राज्यांना बसलेला असताना मोदींनी केवळ गुजरात दौरा करून केवळ गुजरातसाठी तब्बल १ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याने विरोधकांकडून टीका होण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत असे दिसतेय. गुजरात सोडून इतर त्यांना इतर काही दिसत नाही. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातही नुकसानझालं आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीतही पंतप्रधांना केवळ गुजरातच दिसतोय. अशा पंतप्रधान आणि अशा सरकारचा आपण सर्वांनी धिक्कार करायला हवा.

 

News English Summary: Seems like Narendra Modi is the Prime Minister of Gujarat only. He cannot see anyone other than Gujarat. Karnataka, Goa, Maharashtra also witnessed devastation. But even in a natural calamity, the PM can only see Gujarat. We must all condemn such a PM and his government said Prakash Ambedkar.

News English Title: Prakash Ambedkar criticized PM Narendra Modi after announcing relief package to Gujarat only news updates.

हॅशटॅग्स

#PrakashAmbedkar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x