23 February 2025 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

लोकसभा निवडणूक २०२४ | मोठी रणनीती आखली जातेय | आज प्रशांत किशोर पवारांची भेट घेणार

Prashant Kishor

मुंबई, ११ जून | प्रत्यक्ष मोदींना सत्तेत आणण्यासाठी महत्वाची रणनीती आखणारे प्रशांत किशोर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल ते दिल्लीमध्ये भाजपच्या रणनीतीला धोबीपछाड देणारे प्रशांत किशोर सध्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर आता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं वृत्त आहे.

प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहे. आज सकाळी 11 वाजता ते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी येतील. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल दिल्ली, पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे ह्या भेटीची मोठी उत्सुकता आहे.

 

News Summary: Prashant Kishor, who was instrumental in helping Mamata Banerjee’s Trinamool Congress win the by-elections in West Bengal, will meet NCP supremo Sharad Pawar.

News English: Prashant Kishor will meet NCP chief Sharad Pawar today in Mumbai news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x