20 April 2025 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

सगळं खासगीकरण होतंय | सरकारी नोकरीच्या भरंवसे राहू नये | आरक्षणापलिकडे खूप स्पर्धा

Pravin Gaikawad, Maratha Reservation, EWS

मुंबई, २४ डिसेंबर: सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे आजचे आदेश सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र. १५७३७/२०१९ व इतर याचिकांमधील अंतरिम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय कालच जारी केला आहे.

दरम्यान, मराठा समाजानं ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि विषय मिटवून टाकावा, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ईडब्लूएस आरक्षणाबाबतच्या निर्णयाबाबत प्रविण गायकवाड यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा लाभ मिळतोय. सगळं खासगीकरण होणार आहे, त्यामुळं सरकारी नोकरीच्या भरवशावर राहू नये. आरक्षणाच्या पलिकडे खूप मोठी स्पर्धा आहे. आता 85 टक्के नोकऱ्या खासगीकरणात आहेत. पहिल्यासारखं आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी सुरक्षित होती, असं आता राहिलेलं नाही, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.

तसेच, मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण घ्यावं आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं स्पष्टच शब्दात प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं. पुण्यात आज काही संघटनांनी राज्य सरकारच्या ewsआरक्षणाच्या निर्णयाची प्रत जाळून निषेध केला, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

 

News English Summary: Pravin Gaikwad congratulated the state government on the decision regarding EWS reservation. He also appealed to the Maratha youth to take advantage of the EWS reservation. The Maratha community is getting the benefits of Maratha Kunabi and Kunabi Maratha. Everything is going to be privatized, so don’t rely on government jobs. There is a lot of competition beyond reservations. Now 85 percent of jobs are in privatization. Praveen Gaikwad said that the government job was safe through reservation as before.

News English Title: Pravin Gaikawad statement over Maratha Reservation after state government decision about EWS news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या