आज कोरोना लस'चा आढावा | मोदींच्या दौऱ्याला इव्हेंटचं स्वरूप
पुणे, २४ नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी पुण्याच्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देऊन वैज्ञानिकांच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. एकूण पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि समस्त राज्य व देशात एक अनुभवी राजकीय नेते म्हणून सर्वश्रुत असलेल्या शरद पवारांनी प्रथम एखाद्या कोरोना लस संदर्भात आढावा घेतल्याने देशभर वृत्त पसरलं होतं. मात्र कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीला मोदींनी ज्याप्रमाणे आपत्ती उत्सव असल्याप्रमाने इव्हेन्ट केले होते. मात्र आता भारतासहित जगभर कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या बातम्या फिरू लागल्याने मोदी पुन्हा इव्हेंटसाठी सज्ज झाल्याचं जाणार अंदाज व्यक्त करत आहेत.
१ ऑगस्ट २०२० रोजी शरद पवारांनी पुण्याच्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देत प्रगतीचा आढावा घेतला होता. मात्र पवारांनी त्यासाठी कोणताही गाजावाजा केला नव्हता. जगातील १८९ देशांमध्ये याच सीरम इन्स्टीट्युटमधून लशींचा पुरवठा केला जातो. यात पोलिओ, फ्ल्यू, रूबेला अशा आजारांवरील लशींचा समावेश आहे. या वर्षाखेरीस कोरोनावरील लस जगासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जगातील १८९ देशांमध्ये इथून लशींचा पुरवठा केला जातो. यात पोलिओ, फ्ल्यू, रूबेला अशा आजारांवरील लशींचा समावेश आहे. वर्षाखेरीस कोरोनावरील लस जगासाठी उपलब्ध करून देण्यासाठी @SerumInstIndia प्रयत्नशील आहे.#coronavirus #fightagainstcorona pic.twitter.com/SYmCfHhS3a
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 1, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन शहरातील कोरोना लसीच्या उत्पादनाचा आढावा घेणार आहेत. यासाठी ते अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. येथे ते जायडस बायोटेक पार्क येथे जातील. यानंतर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि त्यानंतर हैदराबादमधील भारत बायोटेक प्लांटला भेट देणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी या भेटी विषयी सोशल मीडियाद्वारे (Through Social Media) माहिती दिली होती. PMO ने म्हटले की, भारत कोरोनाविरुद्धच्या लढतीच्या अंतिम टप्प्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांची ही भेट आणि वैज्ञानिकांशी होणाऱ्या संवादामुळे त्यांना भारतात लसीकरणाची तयारी, आव्हाने आणि याच्या रोडमॅपविषयी एक दृष्टीकोन ठेवण्यास मदत होईल.
पहिले ठिकाण : अहमदाबाद
लसीचे नाव : जायकोव-डी़ फॉर्म्युला : जायडस बायोटेक बनवणारी कंपनी : जायडस बायोटेक प्लांट: चांगोदर इंडस्ट्रियल एरिया, गुजरात स्टेटस : तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू
पंतप्रधान मोदी सर्वात आधी अहमदाबाद येथे जाणार आहेत. येथे ते जायडस बायोटेक आपली लस जायकोव-डी तयार करत आहेत. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. गुजरात येथीर जायडस बायोटेक कंपनीची ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे.
दुसरे ठिकाण : पुणे
लसीचे नाव : कोवीशील्ड फॉर्म्युला : ऑक्सफोर्ड विद्यापीठ/ ब्रिटिश फार्मा कंपनी अॅस्ट्रॅजेनेका बनवणारी कंपनी : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्लांट (Syrum Institute of India): पुणे (महाराष्ट्र) स्टेटस : ट्रायल शेवटच्या फेरीत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हॅसिन कोवीशील्ड तयार करण्यासाठी ब्रिटनची कंपनी अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी भागीदारी केली आहे. SII जगात सर्वाधिक प्रमाणात लस बनवते. ही भारतात प्रथम उपलब्ध होणार असल्याचा तज्ञ आणि सरकारी अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.
कोवीशील्डच्या (Kovishild) शेवटच्या टप्प्यातील चाचण्या दोन प्रकारे केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 62% परिणामकारक दिसली तर दुसऱ्या टप्प्यात 90% पेक्षा जास्त. सरासरी, प्रभावीपणा सुमारे 70% आहे.
SIIच्या कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी नुकताच आम्ही लस बनविणे सुरू केल्याचा दावा केला होता. जानेवारीपासून आम्ही दर महिन्याला 5-6 कोटी लस बनवू. जानेवारीपर्यंत आमच्याकडे 8 ते 10 कोटी डोसचा स्टॉक तयार असेल. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आम्ही पुरवठा सुरू करू असेही ते म्हणाले.
तिसरे ठिकाण : हैदराबाद
लसीचे नाव : कोव्हॅक्सिन फॉर्म्युला : भारत बायोटेक आणि ICMR बनवणारी कंपनी : भारत बायोटेक प्लांट: हैदराबाद स्टेटस: चाचणी तिसऱ्या टप्प्यात. जानेवारीपर्यंत परिणाम समोर येण्याची अपेक्षा. पंतप्रधान मोदी दुपारी चार वाजता हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या स्वदेशी लस ‘कोव्हॅक्सिन’ची माहिती घेतील. एक तास लस बनवणाऱ्या प्लांटवर थांबून ते 5.10 वाजता दिल्लीकडे रवाना होतील.
News English Summary: It is planned to visit the Serum Institute in Pune and turn it into an event. Everyone is waiting for the corona vaccine to arrive. Meanwhile, the corona vaccine is being manufactured by a Pune-based serum company and has attracted worldwide attention. Prime Minister Narendra Modi and ambassadors from hundreds of countries will visit the Serum Institute in Pune to take stock of the situation. Movements have started in the administration in this regard. Divisional Commissioner Saurabh Rao has recently convened a meeting regarding the visit of the Ambassador. He has given instructions to the administration in this regard.
News English Title: Prime Minister Narendra Modi will visit Serum institute News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO