3 January 2025 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

पुणे आंबिल ओढा प्रकरण | माझा काय संबंध ? मला का बदनाम केले जात आहे - अजित पवार

Pune Ambil Odha

मुंबई, ३० जून | काही दिवसापूर्वी पुणे महापालिकेने दांडेकर पुलानजीक असलेल्या आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण कारवाई केली होती. अतिक्रमण कारवाई दरम्यान वाद उफाळला होता. त्यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांस टीकाटिपणी करू लागले. याच मुद्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईचा आणि माझा काय संबंध ? मला का बदनाम केले जात आहे, अशी विचारणा करीत या कारवाईत हस्तक्षेप नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी पवार हे मंगळवारी मुंबईतील एका बैठकीत बोलत होते.

पुण्यातील आंबिल ओढा कारवाईमागे पवार यांचा हात असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावर पवार यांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील विविध प्रश्न, त्यावरील अंमलबजावणी अडथळे आणि उपाय यावर अजित पवार यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. त्यावेळी आंबिल ओढ्याभोवती सीमाभिंत बांधण्याचा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी पवार म्हणाले, आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईचा संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘आंबिल ओढ्यालगत सीमाभिंती उभारणीबाबतच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून येत्या शुक्रवारी निर्णय घेऊ, असं ते म्हणाले दरम्यान,आंबिल ओढ्याभोवती सीमाभींत का बांधली जात नाही, याची विचारणा करीत पवार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली.

बैठकीदरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले, ‘पावसाळ्यात आंबिल ओढ्याला पुराचा धोका असल्याने सीमाभिंत बांधण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी त्यातील नेमकी कार्यवाही करण्यासाठी पुण्याचे महापौर आणि महापालिकेतील अन्य पदाधिकान्यांशी चर्चा केली जाईल. तेव्हा निर्णय करू. सीमाभिंत बांधण्याचा ठराव झाला तरी, पुणे महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याकडे आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, सचिन दोडके, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका आश्विनी कदम यांनी अजित पवार यांचे लक्ष वेधले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pune Ambil Odha deputy chief minister Ajit Pawar raised question news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x