22 December 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

भोसरी जमीन प्रकरण | खडसेंनी पदाचा गैरवापर केला नसल्याची फडणवीसांच्या काळात क्लीन चिट... मग?

Eknath Khadse

मुंबई, ०७ जुलै | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

तत्पूर्वी म्हणजे मे २०१८ मध्ये भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी तत्कालीन भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारच्या काळात मोठा दिलासा मिळाला होता. सदर प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे एसीबीनं क्लीन खडसेंना क्लीन चिट दिली होती. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेले नाही, असं एसीबीनं अहवालात म्हटलं होतं. तो अहवाल एसीबीकडून पुणे कोर्टात सादर करण्यात आला होता. खडसेंविरोधातील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, असंही या अहवालात एसीबीनं नमूद केलं होतं.

पुणे एसीबीने न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला होता. या अहवालात एकनाथ खडसेंना क्लीन चिट देण्यात आली होती. भोसरीतील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडाला नाही, असं एसीबीने अहवालात नमूद केलं होतं. त्यामुळे खडसेंसह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, याप्रकरणी आम्ही कोर्टात अहवाल सादर केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याबद्दल अधिक बोलणार नाही, असं एसीबीचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितलं होतं.

उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं:
क्लीन चिट नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘खडसेंच्या विरोधात सर्व पुरावे असताना त्यांना क्लीन चिट कशी मिळू शकते?,’ असा सवाल त्यांनी केला होता. मुख्यमंत्री (तत्कालीन ) देवेंद्र फडणवीस सध्या सर्वांनाच क्लीन चिट देत आहेत. त्यातलाच हा प्रकार तर नाही ना? अशी शंका उपस्थित करतानाच एसीबी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pune Bhosari MIDC Land clean chit was given to Eknath Khadse during Fadnavis tenure news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x