28 January 2025 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

सरनाईकांच्या पत्रानंतर भाजप नेत्यांना प्रेमाच्या उकळ्या | आधी सोनिया सेना टीका, आता हिंदुत्व पुढे

BJP MP Girish Bapat

पुणे , २१ जून | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबत युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे, असं रोखठोक भाष्य भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहे. महानगरपालिकेत शिवसेना भारतीय जनता पक्ष अशी युती होऊ शकते, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असंही खासदार गिरीश बापट म्हणाले.

भारतीय जनता पक्ष-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतंय ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते. राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भारतीय जनता पक्षाने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण भविष्यात अशी युती झाली तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं देखील खासदार गिरीश बापट म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Pune BJP MP Girish Bapat reaction after Shivsena MLA Pratap Sarnaik letter to CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x