महिलांबद्दल अश्लील कमेंट्स | पोलीस तक्रारीत रुपाली पाटील यांच्याकडून महाराष्ट्र सैनिकांचीही नावं

पुणे, ७ डिसेंबर: समाज माध्यमांवर अश्लील भाषा हा रोजचाच खेळ झाला आहे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय पोलीस तक्रारी देखील वाढू लागल्या आहेत. मात्र सध्याच्या प्रकाशझोतात आलेल्या पोलीस तक्रारीत एका महाराष्ट्र महिला सैनिकानेच पुरुष महाराष्ट्र सैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मनसेच्या पुण्यातील उमेदवार रुपाली पाटील यांनी स्वतः पोस्ट टाकून त्याबद्दल माहिती दिली आहे.
चला कायदेशीर तक्रार दिली आहे लवकर भेटूच
सर्व विकृत लोकांनासोशल वर विकृती नाही म्हणजे नाही आणि महिलेला तर नाहीच…
Posted by Rupali Patil Thombare on Monday, December 7, 2020
वास्तविक सदर तक्रार ही मनसेच्या ग्रुपमधील काही उपहासात्मक प्रतिक्रियांमधून वाढत गेली आणि त्याच रूपांतर शिवीगाळ तसेच अश्लील प्रतिक्रियांमध्ये झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. मात्र काही महाराष्ट्र सैनिकांची माहिती घेतली असता त्यांच्याबद्दल पक्षात चांगलं नाव असून ते पक्षासाठी चांगली समाज कार्य करत असतात असं डोंबिवली-कल्याणमधील कार्यकर्त्यांकडून समजलं, तसेच ते महिलांबाबत असं कृत्य करणार नाहीत असं देखील त्यांचं ठाम मत आहे. अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तशा प्रतिक्रिया रुपाली पाटील यांना देखील दिल्याचं दिसतं.
परंतु, रुपाली पाटील यांनी काही चांगल्या कार्यकर्त्यांची नाहक आणि सार्वजनिक बदनामी केल्याचा राग देखील मनसेच्या ग्रुपमध्ये पाहायला मिळत आहे. त्यातील अनेकांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नाहक बदनामी होण्याची शक्यता असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. विषय पेटला आहे तो पुरुष महाराष्ट्र सैनिकांनी महिला महाराष्ट्र सैनिकांना प्रतिउत्तर देताना अश्लील भाषेचा वापर केल्याच्या विषयावरून. मात्र कायदा हा दोन्ही बाजूला सारखाच असतो असं म्हटल्यास तोच गुन्हा, म्हणजे जी अश्लील भाषा पुरुष महाराष्ट्र सैनिकांनी देखील वापरली नसावी त्यापेक्षा अश्लील भाषा महिला महाराष्ट्र सैनिकांच्या संबंधित स्क्रिनशॉटमध्ये स्पष्ट दिसतं आहे.
रुपाली पाटील यांनी केलेल्या तक्रारीमुळे महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर संतापल्याचं पाहायला मिळतं आहे. रुपाली पाटील यांनी पोलिसांना पुरावा नक्कीच दिला असणार यात वाद नाही. परंतु महिला महाराष्ट्र सैनिकांनी वापरलेली अश्लील भाषा देखील निषेधार्यच आहे असं म्हणावं लागेल. काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या नावाने फेक प्रोफाइल बनवून देखील असे प्रकार केले जातात. मात्र रुपाली पाटील यांनी पोलीस तक्रारीत संबंधित मनसे कार्यकर्त्यांचे मोबाईल नंबर्स देखील सार्वजनिक केले आहेत. यातील अनेकजण चांगल्या कुटुंबातील आणि नोकरी धंदा सांभाळून मनसेसाठी समाज कार्य करणारे असल्याचं देखील समजलं. त्यामुळे दुसरी बाजू देखील समोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूची चौकशी करणं गरजेचं आहे.
महिलांबाबत महाराष्ट्र सैनिकांची प्रतिमा इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा उजवी आहे. मात्र मनसेतील हे अंतर्गत तक्रार युद्ध पाहून मनसेतच राग उमटू लागला आहे. त्यात मागील काही महिन्यापूर्वी नवी मुंबई आणि ठाण्यातील कार्यकर्त्यांचा वाद समाज माध्यमांवर सार्वजनिक झाल्यावर सर्वत्र वृत्त प्रसिद्ध झाली आणि दखल थेट कृष्णकुंजवर घेतली गेली. त्यानंतर राज ठाकरे यांनी अंतर्गत वादाबद्दल समाज माध्यमांवर विषय सार्वजनिक करायचा नाही असा आदेश दिल्यानंतर देखील रुपाली पाटील यांनी या विषयावरून समाज माध्यमांवर चर्चासत्र भरवल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे यावर राज ठाकरे योग्य माहिती घेऊन नेमकी काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.
News English Summary: Pornography has become a daily occurrence on social media, and subsequent political police complaints are on the rise. However, in the current police complaint, only one Maharashtra woman soldier has lodged a complaint against male Maharashtra soldiers. Rupali Patil, the MNS candidate from Pune in the recent graduate constituency elections, has posted about it herself.
News English Title: Pune MNS leader file the police complain against many more including MNS works too news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL