16 April 2025 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही | अशोक चव्हाण

PWD Minister Ashok Chavan, CM Uddhav Thackeray

परभणी, ३१ ऑक्टोबर: महाविकास आघाडी सरकारमध्ये काही बाबतीत आलबेल नसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच निवडणुकीनंतर भाजपाचं सरकार येऊ नये यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, शिवसेनेची आघाडी करायची की नाही? याबाबत भरपूर चर्चा झाली, सोनिया गांधी आमच्यावर नाराज होत्या. परंतु आमची मते आम्ही पक्षनेतृत्वाकडे मांडली, भाजपाला रोखण्यासाठीच शिवसेनेला पाठिंबा दिला, भाजपाचं सरकार नको, त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे अशी भूमिका पटवून सांगितले, त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये आली असंही अशोक चव्हाणांनी सांगितले.

मात्र तिन्ही पक्षांमध्ये चांगल्यापद्धतीने समन्वय आहे, निधीच्या बाबतीत नाराजी आहे त्याचा परिणाम सरकारवर होईल असं बिल्कुल नाही, निधी सगळ्यांनाच हवा आहे. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात याबाबत अधिक भाष्य करू शकतील अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.

 

News English Summary: In some cases, the Mahavikas Alliance government did not have coordination. Now, once again, the Congress party has expressed its displeasure. Public Works Minister Ashok Chavan has said that Congress Municipal Corporations are not getting funds from the Chief Minister. Nanded also did not get the funds, but he said that he got the funds from the Public Works Department.

News English Title: PWD Minister Ashok Chavan not happy with CM Uddhav Thackeray News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या