23 February 2025 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

राज ठाकरे यांच्या मातोश्रीविरुद्धच्या बंडासाठी राऊत जबाबदार होते, विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Radhakrishna Vikhe Patil, Sanjay Raut, Raj Thackeray's revolt

अहमदनगर, २३ जून: सामना अग्रलेखात केलेल्या टीकेचा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखात विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला विखे पाटील यांनी पत्राद्वारे जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. या पत्रात त्यांनी राज ठाकरे यांच्या बंडासाठी संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि वेळेवर कोणी यू-टर्न घेतले, हा इतिहास लोकांना माहिती आहे. मी त्याविषयी वेगळे काय सांगणार, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

माझ्या बदनामीचे षड्यंत्र असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुखदु:खाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरात दोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे यांनी केला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत कोणाच्या भेटी घेतल्या त्यांची नावे आम्हाला जाहीर करायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला. माध्यमांशी बोलतांना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या न झालेल्या भेटीची चर्चा जाणीवपूर्वक सुरु करुन मला बदनाम करण्याचा काहींचा हेतू आहे. या बदनामीकारक चर्चेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. पक्षाला मिळालेल्या यशात थोरातांचे कर्तृत्व शून्य आहे. त्यांना सर्व अपघाताने मिळाले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मागील साडेचार वर्षे थोरात गायबच होते.

तसेच मी भाजपमध्ये आनंदी आहे. पण महाविकासआघाडीचा एका शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करु न शकल्याचे दु:ख असेल आणि त्यातून आलेली अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला.

 

News English Summary: Vikhe Patil has given a strong reply through a letter. In the letter, he has accused Sanjay Raut of being responsible for Raj Thackeray’s revolt. People know the history of who incited Krishnakunj to revolt against Matoshri and who took a U-turn on time.

News English Title: Radhakrishna Vikhe Patil has accused Sanjay Raut of being responsible for Raj Thackeray’s revolt News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x