15 November 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

पडद्याआड हालचाली! काँग्रेस-राष्ट्रवादीत फेर-मेगाभरती होण्याची शक्यता? सविस्तर वृत्त

Radhakrishna Vikhe Patil, BJP Maharashtra, Congress

मुंबई: सरकार स्थापनेच्या सुरुवातीलाच बहुमताचा आकडा गाठणं अशक्य असल्याचं लक्षात येताच भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं जाहीर केलं. मात्र, मागील दोन दिवसांपासून असमर्थ ठरणारे भाजपचे नेते अचानक पुन्हा आमचंच सरकार येणार असं वारंवार बोलू लागले आहेत. परंतु, त्यामागील मुख्य कारण दुसरंच असल्याचं वृत्त आहे. कारण महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होताच भारतीय जनता पक्षातील विद्यमान नेते मंडळी भाजपाला सोडचिट्ठी देण्याचा मार्गावर असल्याची चुणचुण भाजपाला लागली आहे.

अगदी सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास भाजपाला रामराम ठोकून काँग्रेस-राष्ट्र्वादीत फेर-मेगाभरती होणार असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपमध्ये गेलेले काँग्रेस-राष्ट्र्वादीतील मोठे नेते सामील असून, त्यात सर्वाधिक नेते विधानसभेत आमदार होऊन निवडून आले आहेत. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास, काँग्रेसचे नगरमधील माजी नेते तसेच माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा देखील समावेश असल्याचं वृत्त आहे. भाजपमध्ये देखील त्यांनी विशेष कामगिरी न केल्याने त्यांचं भाजपातील वजन घटलं असून, भाजपाची सत्ता देखील गेल्याचे जवळपास निश्चित झाल्याने विरोधी पक्ष नेते पद देखील फडणवीसांना जाणार हे देखील निश्चित आहे. त्यामुळे विखे पाटील ५ वर्ष विधानसभेत केवळ आमदार म्हणून राहतील जे त्यांना राजकीय दृष्ट्या धोक्याचं आहे.

भाजपमध्ये आयत्यावेळी प्रवेश केलेल्या नेत्यांची निकालानंतरच्या घडामोडींमुळे मोठी राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना २०२४च्या अनुषंगाने मतदारसंघात स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचे असल्यास राज्यात सत्तेत येणाऱ्या राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेनेच्या आश्रयाला जावे लागेल अशी राजकीय अडचण निर्माण झाली आहे. त्यात प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वतः काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासोबत देखील गुप्त चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भाजपातील एकूण १७ विद्यमान आमदारांना घेऊन आम्ही स्वगृही परतण्यास तयार आहोत असा निरोप काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे धाडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सत्ता येणार असं चित्र निर्माण केल्याने बिथरलेले अनेक दिग्गज नेते काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपात मेगाभरती मार्फत दाखल झाले होते. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर, शिवसेनेने ऐतिहासिक निर्णय घेत भाजपाला सोडचिट्ठी देत, शरद पवारांच्या मदतीने अभूतपूर्व राजकीय इतिहास रचला आणि राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

विशेष म्हणजे या फुटीरवादी नेत्यांची वेगळी बैठकच या निमित्ताने झाल्याचे वृत्त असून लवकरच भाजपाला मोठा राजकीय धक्का देण्याची योजना आहे. सरकार स्थापन होताच जिल्हापातळीवर भारतीय जनता पक्षात मोठी फुट पाडली जाणार असल्याची भाजपाला चुणूक लागल्याने भाजपचे नेते धास्तावले आहेत हे त्यांचे चेहरेच सांगतात. विशेष म्हणजे त्यावर भाजपकडे कोणताच उपाय नसल्याने नेमकं काय करावं आणि काय करू नये अशी अवस्था देवेंद्र फडणवीसांपासून सर्वांचीच झाली आहे. त्यामुळेच लवकरच भाजपचंच सरकार येणास असं निदान वक्तव्य तरी करा असं अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांना सुचवलं आणि अनेक दिवसांपासून तोंड बंद असणारे फडणवीस कॅमेऱ्यासमोर आले आणि आमचंच सरकार येणार असं बोलून गेले, ज्याला कोणताच आधार नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद तसेच महामंडळ स्तरावर भाजपला जोरदार धक्के लागणार असून, प्रशासन पातळीवर अनुभवी असणारे राष्ट्रवादी आणि कॉग्रेस नेत्यांमुळे भाजपाला मोठा अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता अनेक राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x