28 January 2025 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

राफेल दलालीच्या फ्रेंच मीडिया रिपोर्टवर देशातील मीडिया शांत | केवळ देशमुख प्रकरणावर प्रश्न

Rafael scam, gift to brokers, French media report

मुंबई, ५ एप्रिल: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी तसे पत्र लिहित ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले होते. दरम्यान, आज (५ एप्रिल) मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.

राज्यातील भाजपचे सर्व नेते सध्या अनिल देशमुख प्रकरणावर भाष्य करत आहेत. दुसरीकडे राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र यावर भाजप नेते काही घडलंच नसल्याचा आव आणत असल्याचं पाहायला मिळतंय.

एका बाजूला फ्रेंच मीडियाने राफेल घोटाळ्यातील दलालीवर पुराव्यासहित रिपोर्ट दिलेला असताना भारतातील मीडिया मात्र भाजप नेत्यांना एकही प्रश्न विचारताना दिसत नाहीत. दुसरीकडे मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर केंद्र आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र जाहीर पत्रकार परिषदेत भारतीय मीडियातील मंडळी भाजप नेत्यांना प्रश्न विचारताना दिसत नाहीत. समाज माध्यमांवर भाजप समर्थक सेलेब्रिटी देखील देशमुख प्रकरणाला हवा देताना दिसत आहेत.

 

News English Summary: While the French media has reported on the Raphael scam with evidence, the Indian media does not seem to be asking any questions to the BJP leaders. On the other hand, after the order of the Mumbai High Court, the Center and BJP leaders have become aggressive. But in the public press conference, the Indian media is not seen asking questions to the BJP leaders. Pro-BJP celebrities are also seen airing the Deshmukh issue on social media.

News English Title: Rafael scam gift to brokers from India French media report news updates

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x