23 November 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

हवेतले नेते सत्ता गेल्यावर जमिनीवर | जमिनीवरील नेते नेहमी जमिनीवरच

Rain floods, Farmers, Maharashtra BJP

बारामती, १९ ऑक्टोबर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पाहणीला सुरूवात केली. यावेळी ते गावागावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतल्या. आशातच, अतिवृष्टीमुळं रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा प्रश्न असतानाच देवेंद्र फडणवीस चिखल तुडवत गावकऱ्यांची भेट घ्यावी लागली.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी, काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत फडणवीस यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

मात्र गेल्यावर्षी सांगली कोल्हापूर पूरपरिस्थितीच्या वेळी हेच भाजपचे नेते राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने रथ यात्रेच्या व्यस्त होते. माध्यमांनी धारेवर धरल्यावर यात्रा थांबवून फडणवीसांसहित सर्व नेते पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हवेतून फिरताना दिसले होते.

त्यावेळी भाजप वगळता राज्यातील जवळपास सर्व पक्ष सर्वबाजूनी पुरग्रस्तांपर्यंत साधन सामग्री पोहोचवत होते. भाजपनेही नंतर मदत सुरु केली होती, मात्र त्या साधन सामग्रीवर स्टिकर लावून निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरातबाजीची संधी साधली होती.

आजही संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढले आहे. पिकांचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला असून यावरुन राज्यात राजकारणालाही सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून राज्य सरकारला यावरुन टार्गेट करुन जोरदार टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्याच घटनांचा उजाळा देत निशाणा साधला आहे.

नेत्यांचे काही फोटो शेअर करत त्यांनी “सत्ता गेल्यावर सगळेच जमिनीवर येतात” अशा आशयाचे ट्विट करीत फडणीवसांना चिमटा काढला आहे. सत्यजित तांबे यांनी सुरुवातीला ट्विट करताना म्हटलं की, “माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे. सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात.” दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी फडणवीस सरकारमधील नेत्यांचे विमानातून पूरस्थितीची पाहाणी करतानाचे फोटो तसेच ठाकरे सरकारमधील नेत्यांचे प्रत्यक्ष जमिनीवरुन पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोट पोस्ट केले आहेत. तसेच या फोटोंना त्यांनी ”फरक, जमिनीचा व हवेचा!” असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

 

News English Summary: Former Chief Minister of the state and Leader of the Opposition Devendra Fadnavis started inspecting the excess rains and flood situation from Baramati from today. This time he went to the villages and visited the affected farmers. Hopefully, the road has been washed away due to heavy rains. Therefore, while there was a question of how to reach the villagers, Devendra Fadnavis had to visit the villagers treading mud.

News English Title: Rain floods impact badly over farmers from Maharashtra state News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x