15 January 2025 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील वादाशी मनसेचा संबंध नाही - राज ठाकरे

Raj Thackeray, Sushant Singh Rajput, Suicide Controversy

मुंबई, ४ जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग आला आहे. पोलिसांकडून होणाऱ्या सतत विचारपूस व चौकशीच्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने बुधवारी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले होते. सिद्धार्थ पिथानी सुशांतबरोबर त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. अलीकडेच अभिनेत्री संजना सांघी यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. संजनाने सुशांतच्या ‘दिल बेचार’ या शेवटच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या प्रकरणात, YRF कास्टिंग डायरेक्टर आणि जलेबी स्टार अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह सर्वांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यावरुन जो वाद उसळला आहे त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरे यांनी?
“सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद”

आपला नम्र
राज ठाकरे

 

News English Summary: Sushant Singh Rajput committed suicide on June 14 at his residence in Mumbai. Now MNS president Raj Thackeray has clarified his position on the controversy that has arisen over this.

News English Title: Raj Thackerays First Reaction On Sushant Singh Rajput Suicide And The Controversy About His Death News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x