18 November 2024 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
x

राज ठाकरे नाणारमधील 'गुजराती-मारवाडी'च्या मुळाशी जाणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणारवासियांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले असून त्यांनी नाणार मधील जमिनी गुजराती आणि मारवाड्यांच्या नावावर कशा चढल्या आणि त्यांना नाणारमधील येऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती सरकारमधील कोणत्या लोकांनी दिली ते बाहेर येणं गरजेचं आहे अशी थेट भूमिका घेतली आहे.

जर नाणारमधील स्थानिकांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असेल आणि त्या प्रकल्पामुळे जर कोकणातील निसर्गाला धोका निर्माण होणार असेल तर नाणार मध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प होणार नाही म्हणेज नाही अशी परखड भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी नाणारवासियांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि सरकारला थेट इशारा देताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट नाणार प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कंपनीचे मुंबई स्थित ताडदेव येथील कार्यालय फोडले.

नाणारमध्ये राजकीय वातावरण तापले असताना लवकरच उध्दव ठाकरे नाणारमध्ये सभा घेणार असले तरी नाणारवासी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर प्रचंड नाराज असून त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसनेकडे असलेल्या उद्योग खात्यानेच नाणार प्रकल्पासंबंधित अध्यादेश काढला होता. त्यामुळे एकूणच कोकणातील जनतेचा शिवसेने विरोधात रोष वाढताना दिसत आहे तर नाणारच्या प्रक्लबाधितांना राज ठाकरे अधिक विश्वसनीय वाटू लागले असल्याचे एकूणच चित्र आहे.

कोकणात आणि विशेष करून नाणार मध्ये शिवसेनेचे आमदार आणि खासदार असल्याने तो रोष अधिकच वाढत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x