23 February 2025 2:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी | राजेंद्र कोंढरेंची उद्विग्न प्रतिक्रिया

Rajendra Kondhare, Maratha Reservation

कोल्हापूर, १० ऑक्टोबर : मराठा समाजाची अवस्था ही कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजेंद्र कोंढरे म्हणाले की, सगळी सत्व मराठा समाजानेच द्यावी अशी काहींची भूमिका आहे. मात्र, हे चुकीचे असून प्रत्येकवेळी मराठा समाजच समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे असे कोंढरे म्हणाले.

एमपीएससी मध्ये यशस्वी होणारे तरूण हे केवळ एक टक्का आहेत. खासगी क्षेत्रात देखील तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच बंद असलेली सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी अशी मागणीही यावेळी कोंढरे यांनी केली. राज्य शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. या परिक्षेसाठी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना कोंढरे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांनी फक्त स्पर्धा परिक्षेकडेच लक्ष न देता इतरही क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावे. तसेच समाजातील जे गर्भश्रीमंत आणि मध्यमवर्गीय आहे त्यांनी समाजातील तरूणांना मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा काही दिवसानंतर रोजगार नसलेले तरूण दगड घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतील, असे कोंढरे म्हणाले. छत्रपती घराण्याबाबत प्रकाश आंबेडरांनी आदर ठेवायला हवा असेही राजेंद्र कोंढरे म्हणाले.

 

News English Summary: The condition of the Maratha community has become like that of a widow despite the kumkum on her forehead, said Rajendra Kondhare, coordinator of the Maratha Kranti Morcha. He was speaking at a press conference in Kolhapur. Rajendra Kondhre said that the role of some is to give all the essence to the Maratha community. However, this is wrong and the Maratha community will not play a coordinating role every time.

News English Title: Rajendra Kondhare reaction about Maratha Reservation Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x