15 April 2025 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

Rajkishor Modi Join NCP in Beed | राजकिशोर मोदींचा राष्ट्रवादीत प्रवेश | अंबाजोगाई नगरपालिकेसह केज विधानसभेत पक्ष मजबूत

Rajkishor Modi Join NCP in Beed

मुंबई, 21 ऑक्टोबर | मराठवाडा बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकाऱ्यांनीदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मोदी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश (Rajkishor Modi Join NCP in Beed) केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.

Rajkishor Modi Join NCP in Beed. Rajkishore Modi, a senior Congress leader from Beed district and mayor of Ambajogai Municipal Council, has joined the NCP. Along with him, many of his colleagues and office bearers also joined the NCP :

राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आणि त्यासोबत पक्षविस्तार सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे अंबाजोगाई नगरपालिकेसह केज विधानसभेतही राष्ट्रवादी एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हापरिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही

News Title: Rajkishor Modi Join NCP in Beed in presence of DCM Ajit Pawar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या