23 February 2025 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत एकूण ४९ जागा लढवणार: राजू शेट्टी

Raju Shetty, swabhimani shetkari sanghatana, Prakash Ambedkar, Congress, NCP, Maharashtra State Assembly Election 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस-एनसीपीच्या जागावाटपाची अजून बोलणी झाली नसताना इतर लहान सहकारी पक्षांनी त्यांनी किती जागा लढवायच्या ते निश्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखी काँग्रेस आघाडीला फक्त खेळवत बसण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तुम्ही आम्हाला किती जागा द्याव्यात यापेक्षा आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

मात्र असं असलं तरी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सोबतीला जाऊन बसलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना एकूण ४९ जागा लढवणार असल्याचं कालच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात २ दिवसीय कार्यकारणीची बैठक पार पडली त्यात हा ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रस-एनसीपीने आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि सांगली अशा एकूण २ जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले परंतु या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामोरं जावं लागलं आणि त्यात राजू शेट्टींसारख्या दिग्गज नेत्यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या बोलणीत जास्त वेळ न घालवता विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४९ जागांवर तयारी सुरु केल्याचं वृत्त आहे.

दरम्यान कालच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने दुधाच्या आणि प्लॅस्टिक बंदीचा फेरविचार करावा यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन बंद केल्याने कांद्याचे दर प्रतिक्विंटल ४०० रूपयाने खाली कोसळले आहेत. तेंव्हा केंद्राने ताबडतोब निर्यात अनुदान त्वरित चालू करावे असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा आर्थिक वेग उणे ८ टक्के इतका खालावलेला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी विनाअट सरसकट सात बारा कोरा व शेतीचे संपूर्ण वीज बील माफ करून नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे म्हणून शासनाने कर्जमाफी व वीज बील माफी हे दोन्ही निर्णय त्वरित घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#NCP(372)#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x