18 April 2025 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

औरंगाबादमध्ये श्रीरामाच्या फोटोची आरती करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक

Ram Mandir, police arrested MNS activists, pray Lord Rama, Aurangabad

औरंगाबाद, ५ ऑगस्ट : अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.

दुसरीकडे देशभर याचं क्षणाचा आनंद हिंदू समाज अनुभवत आहे. देशभर या निमित्ताने निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र औरंगाबादमध्ये स्थानिक पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना हाच आनंद लुटण्यापासून थांबवलं आणि ताब्यात देखील घेतलं आहे.

औरंगाबाद येथे टीव्ही सेंटर चौकात मनसेच्या वतीने श्रीरामाचा फोटो घेऊन पूजन करण्यात येत होते, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामाची आरती करुन आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली.

दरम्यान, ठाकरे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी समजतं, परंतु सरकार हिंदुत्ववादी राहिलं नाही, श्रीरामाचं पूजन करण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला, या निषेध करतो, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे, श्रीरामाच्या फोटोसह आम्हाला अटक केली आहे, रामाचं पूजन झालंच पाहिजे, मंदिराचं पूजन धुमधडाक्यात झालं पाहिजे, आज तुम्ही आम्हाला थांबवलं, पण हिंदू नेहमी पूजन करणारच, रामाची पूजा करण्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही असं मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी सांगितले.

 

News English Summary: In Aurangabad, a photo of Shri Ram was being taken on behalf of MNS at TV Center Chowk, the police had denied permission for the event, however, MNS workers expressed their happiness by chanting Shri Rama.

News English Title: Ram Mandir police arrested MNS activists pray Lord Rama without permission Aurangabad News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या