राज्य सरकारची दिशाभूल करून गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी - अहवाल सादर

मुंबई, २६ मार्च: राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
राज्यात पोलिस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असून त्यासंदर्भात गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने गेला आठवडाभर खळबळ माजलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल सार्वजनिक करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
बदल्यांची वस्तुस्थिती:
- १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात “भापोसे’च्या १६७ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ४ अपवाद वगळता सर्व पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवर झाल्या होत्या.
- सप्टेंबर २ ते २८ आॅक्टोबर २०२० दरम्यान १५४ बदल्या झाल्या. पैकी १४० बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीने तर १० पदस्थापनेतील बदल सुचवून झाल्या.
- ३१ मार्च २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात राज्य सेवेतील ८३ पोलिस अधीक्षकांच्या, १८६ उपअधीक्षकांच्या, ९६ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यातील ९ बदल्या वगळता सर्व आस्थापना मंडळाच्या शिफारशीने झाल्या आहेत.
रश्मी शुक्ला यांनीच इतक्यात हा अहवाल उघड केला. या अहवालाची प्रत शुक्ला यांच्याकडची असावी. मात्र टाॅप सिक्रेट कागदपत्रे उघड करणे गंभीर बाब आहे. शुक्ला यांनी अहवाल उघड केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांना या अहवालात मुख्य सचिवांनी सूचित केले आहे.
News English Summary: Rashmi Shukla, the then state intelligence commissioner, sought permission from the home department for tapping the phone, citing a threat to public safety. But actually tapped the phones of private individuals. As soon as the matter came to light, Shukla apologised to Chief Minister Uddhav Thackeray. He also wanted to withdraw the report of phone tapping. However, it is suspected that this highly confidential report was leaked by Shukla himself. Shukla, meanwhile, is now likely to be the subject of an “inquiry”.
News English Title: Rashmi Shukla is the one who broke the phone tapping report permission given for terrorism news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB