रुग्णांच्या जीवन मरणाशी संबंधित रेमडेसिवीरचा भाजप नगरसेवकाकडून काळाबाजार आणि मतदार जोडणीसाठी वापर
मुंबई, २१ एप्रिल: भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून नंदुरबारच्या हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा जमा करून ठेवला. ८ आणि १२ एप्रिल रोजी त्यांनी नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात रांगा लावून इंजेक्शन्सचा काळाबाजार केला.
त्यांनी २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिविर ब्रुक फार्मा कंपनीकडून आणून ठेवले होते. त्यामुळेच राज्याच्या एफडीएने वारंवार विचारणा करूनही ब्रुक फार्मा महाराष्ट्रात इंजेक्शन्स देण्यास तयार नाही, असा गंभीर गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी इंजेक्शन्सची विक्री चालू असलेले व्हिडिओ, फोटो, त्यांनी केलेल्या जाहिरातीदेखील माध्यमांना दिल्या आहेत.
एखादा माजी आमदार बेकायदेशीरपणे २० हजार इंजेक्शन्सचा साठा ठेवतो, विकतो, आणि नंतर तोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटतो. हे सगळे मोठे षड्यंत्र आहे. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात त्यांचा गोरखधंदा सुरू होता. त्याचवेळी विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे लेखी तक्रार करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नसल्याचं अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
भाजपचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून नंदुरबारच्या हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा जमा करून ठेवला. ८ आणि १२ एप्रिल रोजी त्यांनी नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात रांगा लावून इंजेक्शन्सचा काळाबाजार केला. pic.twitter.com/yS2KuyTgJj
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) April 21, 2021
News English Summary: Shirish Chaudhary, a former BJP MLA from Jalgaon-Amalner and owner of Hira Group, along with his brother, stockpiled thousands of remedicivir injections at the Hira Executive Hotel in Nandurbar. On April 8 and 12, they lined up in Nandurbar, Jalgaon and Dhule districts to blackmail the injections.
News English Title: Remdesivir injection stocking in Maharashtra is serious issue in corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा