15 November 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

राज्याला आजपासून प्रतिदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्या मिळणार | अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची माहिती

Remdesivir Injection

मुंबई, २१ एप्रिल: मागील आठवडाभर राज्याला केवळ ३५ हजार रेमडेसिविरच्या कुप्या मिळत होत्या. मात्र सात कंपन्यांच्या बॅच येण्यास प्रारंभ झाला असून राज्याला दैनंदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्या बुधवार, दि. २१ एप्रिलनंतर प्राप्त होतील. त्यामुळे रेमडेसिविरचा राज्यातील तुटवडा संपुष्टात येईल, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ब्रुक, बीडीआर आणि हिमाचल प्रदेश येथील निक्सी लॅब अशा तीन कंपन्यांना त्यांच्याकडचे निर्यातीचे रेमडेसिविर महाराष्ट्रात विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र या कंपन्यांना राज्यातील खासगी व्यक्तींना विक्री करता येणार नाही. त्यांना केवळ महाराष्ट्र सरकारला रेमडेसिविर विकता येईल, असे शिंगणे यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसिविरचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवड्याबाबत पुरवठादार कंपन्यांसोबत बोलणी केली होती.

दरम्यान, कमिशनमुळे रेमडेसिविरच्या सरकारी निविदा रखडल्याच्या प्रवीण दरेकर यांच्या आरोपात तथ्य नाही. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने बीडीआर कंपनीकडून ५ लाख रेमडेसिविरच्या कुप्या मागवल्या होत्या. मात्र कंपनीने परवान्याचे तांत्रिक कारण देत पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे शिंगणे यांनी सांगितले.

दरम्यान, रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राजकारण तापलं आहे. यातच आता राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली केली आहे. काळे यांची बदली केल्यावरूनही राजकारण सुरू झालं आहे. राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बदलीचं स्वागत केलं आहे. तर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

 

News English Summary: Last week, the state was getting only 35,000 kits of remedicivir. However, batches of seven companies have started arriving and the state is receiving 65,000 remedicivir coupons daily. Received after April 21. This will end the shortage of remedies in the state, Food and Drug Administration Minister Rajendra Shingane told reporters on Tuesday.

News English Title: Remdesivir Injection supply to Maharashtra over corona pandemic minister Rajendra Shingane information news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x