23 December 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

VIDEO | पोलिस संरक्षण हटवा | नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची आपली तयारी - आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar

हिंगोली, २५ ऑगस्ट | राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पायाचीही बरोबरी नसलेल्या केंद्रीय राज्यमंत्री राणे यांनी त्यांच्या बद्दल बोलणे चुकीचे आहे. पोलिस संरक्षण बाजूला केल्यास त्यांच्या घरात घसून त्यांचा कोथळा बाहेर काढण्याची आपली तयारी असल्याचे खुले आव्हान कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी ता.२४ रात्री झालेल्या आंदोलनाच्या वेळी दिले.

पोलिस संरक्षण हटवा, राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची आपली तयारी – Remove police protection we will punish Narayan Rane in house said Shivsena MLA Santosh Bangar :

हिंगोली येथे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी चौकात केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी राम कदम, नगरसेवक श्रीराम बांगर, परमेश्‍वर मांडगे, माजी उपसभापती अजय सावंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राणे यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे काम उत्कृष्ठ पध्दतीने सुरु आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचे देशभरात कौतूक केले जात आहे. राज्यात सर्व चांगले काम सुरु असतांना मात्र केंद्रीय राज्यमंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्याच्या विरुध्द बेताल वक्तव्य केले. मात्र हा प्रकार सुर्यावर थुंकण्या सारखा आहे. राणेंना ज्या पक्षाने सोबत घेतले त्या पक्षालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. राणे कोणत्या एका पक्षाचे होऊ शकले नाही ते भाजपचे काय होणार असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्यल करणाऱ्या केंद्रीय मंत्री राणे यांच्या घरात घूसून मारण्याची आमची तयारी आहे. पोलिस संरक्षण बाजूला केल्यास राणे यांच्या घरात घुसून त्यांचा कोथळा बाहेर काढू असा इशारा वजा खुले आव्हान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी यावेळी दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Remove police protection we will punish Narayan Rane in house said Shivsena MLA Santosh Bangar.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x