22 April 2025 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा: उदयनराजे भोसले

Chhatrapati Udayanraje Bhonsale, Shivsena, Thackeray Sena, CM Uddhav Thackeray

सातारा: भारतीय जनता पक्षाचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

गोयल नावाच्या कुण्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी ते वाचलेले नाही. वास्तविक या जगात महाराजांच्या उंचीपर्यंत कुणीही जाऊ शकणार नाही. एक युगपुरूष कधीतरी जन्माला येतो. ते म्हणजे शिवाजीराजे. तुलना करणाऱ्या लोकांची बुद्धी गहाण ठेवली आहे का?, असा सवाल करत तुलना करणाऱ्या या पुस्तकामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच या तुलनेमुळे वाईट वाटल्याचेही ते म्हणाले.

यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर जोरदार टीकेची झोड उठवली. स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा संतप्त सवाल उदयन राजेंनी विचारला. तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशी विचारणा करत उदयनराजेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली. तसेच शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

“एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो,” असं यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. “फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असं यावेळी ते म्हणाले.

आजपर्यंत प्रत्येकवेळेस लुडबूड करणारे लाेक असतात. त्यांचे नाव घ्यायचे नाही मला. वाईट एवढंच वाटतं की काही झालं तरी ब्लेम गेम केला जाताे. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलाे याचा सार्थ अभिमान आहे. मागच्या जन्मी माझ्याकडून चांगलं काम झालं असेल म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. मी हे माझं साैभाग्य माणताे. महाराजांचा वंशज म्हणून नावाचा दुरपयाेग केला नाही. राजेशाही गेल्यानंतर लाेकशाही आल्यानंतर आम्ही लाेकशाही मान्य केली. तुम्ही आम्ही बराेबर आहाेत ही संकल्पना चुकीची नाही. शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव संकल्पना आता कुठे गेली. असा प्रश्न देखील उदयनराजे यांनी उपस्थित केला.

 

Web Title:  Rename shivsena Party name to Thackeray Sena says satara former MP Udayanrajes Bhonsale advice.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या