17 April 2025 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

रेणू म्हणाली त्यांच्यासोबत माझा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ नाही | म्हणजे वकील खोटं?....

Renu Sharma, minister Dhanajay Munde, opposition leaders

मुंबई, २२ जानेवारी: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल(दि.२१) लेखी निवेदन दिलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.

रेणू शर्मा महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट व्हिडिओ बद्दल भाष्य करून इशारा दिला होता…पण आज रेणू शर्माने दुपारी प्रसिद्ध केलेल्या लेखी निवेदनात असा कोणताही व्हिडिओ नसल्याचं मान्य करताना थेट विरोधकांवर संशय व्यक्त केला आहे. पण त्यापूर्वी ऐका रेणू शर्माचे वकील रमेश त्रिपाठी यांनी काय म्हटलं होतं..

दरम्यान त्याबाबत रेणू शर्माने दुपारी एक निवेदन दिलं आहे, त्यात तिने म्हटलं आहे की;

मी स्पष्ट करू इच्छित आहे की, माझी बहिण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून मतभेद निर्माण झाले आहेत आणि त्याबाबत कोर्टात केस सुरू आहे. यामुळे मी मानसिक तणावात आणि दबावाखाली होते. मात्र, विरोधी पक्ष ज्या पद्धतीने त्यांच्याविरुद्ध सक्रिय झाला आहे ते पाहता मी कोणत्या तरी मोठ्या राजकीय षडयंत्राची बळी होत आहे आणि काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत, असे मला दिसत आहे. हे सर्वच चुकीचं असून मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव खराब करायचं नाही. शेवटी मी इतकंच सांगेन की, धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दाखल तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे. त्यांच्याविरुद्धच्या कोणत्याही तक्रारीचा मी आता पाठपुरावा करणार नाही. मला लग्नाचं वचन देऊन ते न पाळल्याची आणि बलात्काराची माझी आता कोणतीही तक्रार नाही, हे मी रेकॉर्डवर सांगत आहे. त्यांच्यासोबत माझा कोणताही आक्षेपार्ह फोटो वा व्हिडिओ नाही, हेसुद्धा मी नमूद करत आहे. हे स्टेटमेंट मी अत्यंत जबाबदारीने आणि सजगपणाने देत आहे.

 

News English Summary: Renu Sharma’s lawyer Ramesh Tripathi had warned the media by commenting on the live video … but in a written statement released this afternoon, Renu Sharma admitted that there was no such video and expressed doubts about the direct opposition. But before that, listen to what Renu Sharma’s lawyer Ramesh Tripathi had said.

News English Title: Renu Sharma issued statement over Dhanajay Munde issue with allegations on opposition leaders news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या