8 September 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत | राज्यात 200 विधानसभांमध्ये रॅली काढणार - महादेव जाणकर

RSP chief Mahadev Jankar

औरंगाबाद, ०९ ऑगस्ट | राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.

महादेव जानकर यानी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी आम्ही पक्ष संघटना वाढवण्यावर भर देणार आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व प्रभागात रासपचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, असं जानकर म्हणाले. रासप पक्ष वाढत आहे. रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं

200 विधानसभांमध्ये रॅली काढणार:
100 गाड्या घेऊन रासप राज्यातील 200 विधानसभांमध्ये रॅली काढणार आहे. या देशात जनावरांची जनगणना होते, पण माणासांची होत नाही. काँग्रेसची सत्ता असताना मंडल आयोग लागू का झाला नाही? असा सवाल करतानाच ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: RSP chief Mahadev Jankar press conference at Aurangabad news updates.

हॅशटॅग्स

#MahadevJankar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x