23 December 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

पंकजा माझी बहीण, अन्याय झाल्यास मला सांगावं मग बघू | जाणकरांचा पंकजा मुंडे विरोधकांना इशारा

RSP chief Mahadev Jankar

औरंगाबाद, ०९ ऑगस्ट | राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.

महादेव जानकर यानी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी आम्ही पक्ष संघटना वाढवण्यावर भर देणार आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व प्रभागात रासपचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, असं जानकर म्हणाले. रासप पक्ष वाढत आहे. रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं

200 विधानसभांमध्ये रॅली काढणार:
100 गाड्या घेऊन रासप राज्यातील 200 विधानसभांमध्ये रॅली काढणार आहे. या देशात जनावरांची जनगणना होते, पण माणासांची होत नाही. काँग्रेसची सत्ता असताना मंडल आयोग लागू का झाला नाही? असा सवाल करतानाच ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

पंकजा विरोधकांना थेट इशारा:
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी समोर आली होती. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं राजीनामासत्रही सुरु झालं होतं. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्याना राजीनामे परत घेण्याचं आवाहन केल्यानंतर हे राजीनामा सत्र थांबलं. मात्र, त्यावेळी महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यावर बोलताना जानकर म्हणाले की, पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. तिच्यावर काही अन्याय झाला असेल तर माझ्या बहिणीनं मला सांगावं मग बघू, असा इशाराच त्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना दिला आहे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: RSP chief Mahadev Jankar warn over demoralizing Pankaja Munde in BJP news updates.

हॅशटॅग्स

#MahadevJankar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x