5 November 2024 10:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

CDR वरून फडणवीसांची कोंडी | CDR मिळवणे गुन्हा | विरोधकांच्या आवाहनाने अडचणीत

Sachin Sawant, Devdnra Fadnavis, CDR, Sachin Vaze

मुंबई, १६ मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असे त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेले आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या जबाबदारपदावर काम केलेले आहेत. त्यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे, नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचेकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसचीही भूमिका आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने CDR रॅकेट उघडकीस आणून त्यातील दोषींवर कारवाई केली होती. सामान्य लोकांना एक न्याय आणि फडणविसांना दुसरा न्याय हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडील माहिती तपास यंत्रणांना देऊन सहकार्य करावी अशी अपेक्षा आहे.

मोठा आवाज करुन आरडाओरडा करुन महत्वाचे प्रश्न दबले जात नाहीत. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये संविधान महत्वाचे असते, त्यात कायदे व्यवस्था, न्याय व्यवस्था सर्वांसाठी समान आहेत. कोणीही चौकशीच्या चौकटीत येतात. फडणवीसही त्याच चौकटीत बसतात त्यांनी या प्रकरणातील सर्व माहिती तपास यंत्रणांना देऊन जनतेसमोर योग्य आदर्श घालून दिला पाहिजे हीच भावना आहे, असे सावंत म्हणाले.

 

News English Summary: Sachin Sawant further said that it is a crime to get a CDR and it is the duty of Fadnavis as a citizen to disclose the source to the investigating agencies. Therefore, the evidence they have should be given to the investigating agencies. It is also the role of the Congress to take action against whoever is guilty. The law is the same for everyone.

News English Title: Sachin Sawant further said that it is a crime to get a CDR news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x