22 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते, या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या होत्या? - सचिन सावंत

Maratha reservation

मुंबई, २५ मे | मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले होते. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाजीराजेंना भेटले का नाही यावर देखील पाटील काल भाष्य केलं होतं.

मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडलेल्या भूमिकेतील एका मुद्द्यावर बोट ठेवत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सवाल केला आहे.

चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं आहे,” अशी टीका सावंत यांनी केली.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi thinks that Maratha reservation is a state issue. That is why Prime Minister Modi has not been able to meet Sambhaji Raje Chhatrapati till date, said BJP state president Chandrakant Patil. Meanwhile, Congress chief spokesperson Sachin Sawant tweeted a question pointing to an issue in the role played by Chandrakant Patil.

News English Title: Sachin Sawant tweeted a question pointing over meet of Kangana Ranaut and Priyanka Chopra with PM Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x