केंद्राच्या इंधन दरवाढ, महागाईवरून शांत असलेले सदाभाऊ राज्यातील दूध दरवाढीसाठी जागे झाले? | आंदोलनाची हाक

मुंबई, ०७ जून | देशात सध्या इंधन दरवाढ आणि परिणामी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईवरून देशभरातून मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त होतं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोदी सरकारवर टीका होतं आहे. देशातील आणि राज्यातील एकही भाजप नेता पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेरोजगारी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून तोंड उघडू इच्छित नाहीत. त्यामुळे राज्यातील लोकांना विचलित करण्यासाठी मराठा आंदोलन हा एकमेव मुद्दा भाजप उचलून धरत आहेत. तसेच फडणवीसांच्या सांगण्यावर राजकीय निर्णय घेणाऱ्या ठराविक भाजप नेत्यांना राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषयांना हवा देण्याचे आदेश असल्याची खात्रीलायक माहिती भाजपच्या गोटातून प्राप्त झाली आहे आणि त्याप्रमाणे हालचाली सुरु झाल्या आहेत.
रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीय. दूधाचा भाव वाढवून देण्यासाठी मागणीसाठी सदाभाऊंनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. रयत क्रांती संघटनेकडून 10 जून रोजी दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात चाबूक फोडो आंदोलन करण्यात येणार आहे. तशी माहिती सदाभाऊ यांनी आज सांगलीमध्ये दिली. त्याचबरोबर कोरोना महामारीचं संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, हे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार असल्याची टीकाही खोत यांनी केलीय.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुधाला 8 रुपये प्रति लिटर कमी भावमिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकालाही सहकारी आणि खाजगी दूध संस्थांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. एकीकडे राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होत आहे. मात्र, दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्थांवर कारवाई करण्याचं काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकंच नाही तर खाजगी दूध संस्थांवर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचं सांगण्यात येत आहे. असं असेल तर हा दुग्ध विकास विभागच बंद झाला पाहिजे, अशी टीका खोत यांनी केलीय.
दूध खरेदी दरात राज्य सरकारकडून वाढ झाली पाहिजे, या मागणीसाठी 10 जून रोजी रयत क्रांती संघटनेकडून राज्य सरकारच्या विरोधात चाबूक फोड आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सदाभाऊंनी केलीय. ऊसाच्या एफआरपीप्रमाणे दुधाचा दरही राज्य सरकारने ठरवला पाहिजे, अशी मागणीही खोत यांनी यावेळी केलीय.
News English Summary: Sarvesarva of Rayat Kranti Sanghatana and former Minister of State for Agriculture Sadabhau Khot have once again taken an aggressive stance. Sadabhau has once again announced agitation to demand increase in milk price. The Rayat Kranti Sanghatana will launch a state-wide whip-fodo agitation on June 10 to demand a milk price hike.
News English Title: Sadabhau Khit has announced agitation to demand increase in milk price news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL