सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं घेतला मोठा निर्णय
मुंबई, 25 जून: कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात येत्या रविवारपासून म्हणजेच 28 जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहे.सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. त्याच बरोबर ब्युटी पार्लर आणि जिम सुरू करण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही, असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी सरकारला केला होता. मात्र, सरकार सकारात्मक भूमिका घेत नसल्याचं दिसताना नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी निर्णयाबद्दल बोलताना सांगितलं की, “२८ जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी नाही. सोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. थोडे दिवस पाहणी करुन नंतर पुढील निर्णय घेतला जाईल”.
News English Summary: A major decision has been taken at the state cabinet meeting to start salons that were closed during the lockdown due to corona virus. The state government has given conditional permission to start the salon in the state from next Sunday, i.e. from June 28.
News English Title: Salons To Open From 28th June In Maharashtra News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो