22 January 2025 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

संभाजीराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली | उद्या मुख्यमंत्री, फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार

Maratha reservation

मुंबई, २७ मे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट झाली. यावेळी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट असल्याचं संभाजीराजे म्हणाले. तसंच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.

मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहे. मराठा हा प्रमुख समाज आहे. त्यांचं आरक्षण रद्द झालंय. आता त्यावर मार्ग काढायचा आहे. हा मात्रा एकट्याचा विषय नाही. तर समाजाला न्याया मिळावा हा मुद्दा असल्याचं संभाजीराजे म्हणाले. राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जातपात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जीवलग मित्र होते. दोन्ही घराण्याचं मैत्रीचं नातं आजही काम आहे. राज आणि माझा कॉमन पाईंट आहे. किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती संभाजीराजे यांनी राज यांच्या भेटीनंतर दिली.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

News English Summary: MP Sambhaji Raje Chhatrapati is meeting all party leaders on the issue of Maratha reservation. After meeting NCP President Sharad Pawar, Sambhaji Raje and Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray also met.

News English Title: MP Sambhaji Raje Chhatrapati meet MNS chief Raj Thackeray on the issue of Maratha reservation.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x