22 December 2024 5:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो, ते स्वतः माझ्याकडे आले होते - संभाजीराजे

Maratha reservation

कोल्हापूर, १६ जून | मराठा आरक्षणावरून सुज्ञ भूमिका घेत पुढील लढा उभारणाऱ्या संभाजीराजेंमुळे भाजपचा राजकारण करण्याचा डाव फसल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी संभाजीराजेंना लक्ष केलं होतं. त्यात सर्वाधिक प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

चंद्रकांतदादा म्हणाले होते की, “संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मी भारतीय जनता पक्षाचा खासदार नाही. परंतु, ऑन पेपर ते भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कुणी चालढकल करत असेल, तर ते मान्य होणार नाही. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. परंतु, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का?,” असं चंद्रकांत पाटील इस्लामपूर येथे माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, याच मुद्याला अनुसरून प्रश्न उपस्थित होताच प्रसार माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला. “कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू द्या. मी भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य आहे, पण खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सन्मानपूर्वक हे पद दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Sambhajiraje Chhatrapati reply to BJP state president Chandrakant Patil on statement regarding Rajyasabha parliament membership news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x