22 December 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मराठा आरक्षण | पवार भेटीनंतर संभाजीराजे राज ठाकरेंची भेट घेणार

Maratha reservation

मुंबई, २७ मे | मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत असलेले संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संभाजीराजे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप खासदार संभाजीराजे हे देखील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नारायण राणे या सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा”, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

 

News English Summary: Sambhaji Raje Chhatrapati, who has been meeting scholars, experts and leaders from across the state for the last few days for Maratha reservation, will meet MNS chief Raj Thackeray on Thursday. It is said that Sambhaji Raje will arrive at Raj Thackeray’s Krishnakunj residence around 3 pm.

News English Title: Sambhajiraje Chhatrapati will meet MNS chief Raj Thackeray over Maratha Reservation issue news updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x