23 December 2024 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

जयंतरावांकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम | सांगली महापालिकेत भाजपची सत्ता उलथवली

Sangli Miraj Kupwad, Municipal Corporation, NCP Mayor Digvijay Suryavanshi, Jayant Patil

सांगली, २३ फेब्रुवारी: सांगली-मिरज-कुपवाड मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’ …आज त्याचाच प्रत्यय आला असून सांगली मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा महापौर बसला आहे.

सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते.राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.

महापौर-उपमहापौर निवडीवरुन सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि ते नॉट रिचेबल झाले होते. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. त्या रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले होते.

महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरु होत्या. गेल्या बुधवारी सायंकाळी महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू केले.

 

News English Summary: The flag of Congress-NCP alliance has been hoisted on Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation and Digvijay Suryavanshi of NCP has become the new mayor. Today, the same suffix has come and the mayor of NCP-Congress alliance is sitting on Sangli Municipal Corporation.

News English Title: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation NCP Mayor Digvijay Suryavanshi news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x