23 December 2024 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

सांगली | महापौरपद निवडणूक | भाजपचे ९ नगरसेवक अद्याप नॉटरिचेबल

Sangli municipal corporation, mayor election, BJP 9 corporators

सांगली, २० फेब्रुवारी: सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची महापौर निवडणूक सध्या वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. येत्या २३ फेब्रुवारीला निवडणूक होणार असून भारतीय जनता पक्षाकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धाकधूक वाढली आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीने महापौरपद खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे एकूण ६ सदस्य गळाला लावले आहेत.

तत्पूर्वी सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षापुर्वी पुर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली. ७८ पैकी ४१ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत आले. अर्थात यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्यांचा भरणा मोठा आहे. शिवाय दोन अपक्ष सदस्यांचाही त्यांना पाठिंबा मिळाल्याने त्यांचे संख्याबळ भक्कम झाले. २०१८ मध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात असताना महापालिका जिंकून भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला होता.

भारतीय जनता पक्षाचे १२ नाराज सदस्य फोडण्याचे काम सुरु असताना त्यातील तीन सदस्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते यशस्वी ठरले. मात्र उर्वरित नऊ सदस्य अद्याप नॉटरिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत. मात्र अजून तरी यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे. भारतीय जनता पक्षाकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांनी अर्ज दाखल केला आहे.

 

News English Summary: The mayoral elections for Sangli, Miraj and Kupwad Municipal Corporations have taken a different turn. Elections will be held on February 23 and the Bharatiya Janata Party (BJP) has a majority in power. This is because the third-ranked NCP has fielded a total of six BJP members to win the mayoral post.

News English Title: Sangli municipal corporation mayor election BJP 9 corporators still not reachable news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x