15 November 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

संजय राठोड यांनी राजीनामा पाठविल्याचं वृत्त मातोश्रीवरून फेटाळले

Minister Sanjay Rathod, Matoshri, Pooja Chavan

मुंबई, १६ फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज मातोश्रीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबवून घरोघरी शिवसेना पोहोचविण्याबाबत बैठक पार पडली. तसेच पदाधिकाऱ्यांची गाव पातळीवरील रखडलेली पक्षीय स्तरावरील कामं याबाबत देखील माहिती घेण्यात आली. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नसल्याचं वृत्त आहे. हाती आलेल्या वृत्तानूसार, संजय राठोड यांच्या राजीनामा देण्याबाबतचे सर्व वृत्त मातोश्रीवरील वरिष्ठांनी फेटाळून लावले आहे.

दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. संजय राठोड यांनी राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे मत मांडलं होतं आणि त्या अनुषंगाने पोलीस चौकशी सुरु असल्याने पक्ष तोपर्यंत संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं मत पुढे आलं आहे.

 

News English Summary: Today, a meeting was held on Matoshri to implement Shiv Sampark Abhiyan in every district of the state and to reach Shiv Sena from house to house. Information was also taken about the stalled party level work of the office bearers at the village level. However, there are reports that no meeting or discussion has taken place regarding Forest Minister Sanjay Rathore. According to reports, all reports of Sanjay Rathore’s resignation have been rejected by Matoshri’s superiors.

News English Title: Sanjay Rathod not yet resigned said top leaders connected to Matoshri news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x