8 January 2025 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

सातारा | भाजप नगरसेविकेची पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि गळा चिरण्याची धमकी | Audio क्लिप व्हायरल

Siddhi Pawar audio clip

सातारा, १२ जून | सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरुन राडा सुरु आहे. यावरुन सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगाराला झापलं. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही शिवीगाळ करून गळा चिरून टाकेन, अशा धमकीची ऑडिओ क्लिप साताऱ्यात आणि समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे.

या क्लिपबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सिद्धी पवार आणि पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी पवार म्हणाल्या, “एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे. लोकांची विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला मला सामोरे जावे लागते. मला संताप अनावर झाला असून, लोकांच्या झालेल्या भावनाविवेशामुळे मला बोललेल्या वक्तव्याचा अजिबात खेद नाही”.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
ठेकेदार – हा मॅडम बोला की,

नगरसेविका : काय समजत नाही का, बुद्धीला घाण लागलीय का, काय समजत नाही काय, मी मेले नाही अजून, नरडं कापून ठेवेन एकेकाचं,

ठेकेदार – अहो काय झालं मॅडम

नगरेसेविका – शिवशाहीची कधी करुन देणार आहे भिंत?

ठेकेदार – भिंत कुठली ओ

नगरेसेविका – माहिती नाही तुम्हाला, लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? त्यावेळेला एक भिंत पडली कुमारला सांगितलं होतं, बोंबलून मी.. माझ्याकडे रेकॉर्ड आहे.. विषयच काढायचा नाही कुणी कुठला.. बिप बिप बिप… दोन महिने झाले भिंत बांधून देत आहेत.. लाजा वाटत नाहीत का त्या लोकांना..

ठेकेदार – गेटची भिंत बांधली की मॅडम ती

नगरसेविका – अशी थोबाड फोडीन रंगवीनच त्याचं.. ठाकूरला

कर्मचारी – असू द्या मॅडम, शांत व्हा थोडं

नगरसेविका- आम्ही काय मूर्ख आहे काय? दोन दोन महिने तुझ्या मागं लागायला.. कोण सर आहेत जरा सांगा मला, नाव सांगा

कर्मचारी – अहो ठाकूरलाच

ठेकेदारः सरांना सांगितलं आहे, सर बोलले मटेरियल टाकून घ्या

नगरसेविकाः कोण सर आहेत तुमचे, ….च्या, त्याला हिंदीतलं कळतं, मराठीतलं कळत नाही काय?,

ठेकेदा रः दोन मिनिटं माझं ऐका

नगरसेविकाः ये वसिम कोणाला शिकवतो तू, ठाकूरला माझ्यासमोर आणू नको, मारेन त्याला, माझ्याशी खेळायचं नाही, त्या भाड्याला एक रुपया मिळवून देत नाही, त्याची मर्डर करेन मी, गेलं….,

 

News Title: Satara BJP corporator Siddhi Pawar audio clip of threatening gone viral news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x