सातारा: सत्ता जाताच भाजप आमदारांचा टोलनाका बंद वरून मनसे खळखट्याक मार्ग

सातारा : खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदर्श सध्या सत्ता जाताच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी देखील घेतल्याचं दिसत आहे. फडणवीसांच्या सत्ताकाळात कोणीही कायदा हातात घेऊन आंदोलन करू नये उपदेश देणारे भाजप सरकार सत्ता जाताच खळखट्याक मार्गावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सदर आंदोलन साताऱ्यात घडलं आहे आणि मनसे स्टाईल’मुळे चर्चेत सुद्धा आलं आहे.
महामार्गावरील खड्डे आणि कारपेटींगच्या कामाकडे दूर्लक्ष केल्याने नाईलाज म्हणून आम्हाला आनेवाडी टोलनाका लोकशाहीच्या मार्गाने बंद पाडला आहे. पण आगामी काळात खळखट्याक आंदोलन होईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना त्यांना खळखट्याक का सुचलं नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
महामार्गावर सुविधा देण्यासोबत खड्डे आणि कारपेटींगच्या कामाकडे महामार्ग प्राधीकरणाने दुर्लक्ष केल्याने साताऱ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज आपल्या समर्थकांसह आनेवाडी टोलनाक्यावर जाऊन ‘महामार्गाची कामे करा अन्यथा टोल बंद करा,’ अशा घोषणा देत टोल वसुली बंद केली. यावेळी प्रसार माध्यमांकडे आपली भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ”रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत खड्डे भरून कारपेटींग करतो, असे सांगितले होते. परंतु, त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. सुविधा नसल्याने टोल बंद करावा, अशी सातारकरांची इच्छा आहे. शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या समर्थकांनी टोलनाक्यावर ठिय्या मारला. यावेळी सर्वांनी अन्यायकारक टोल बंद कसा असे लिहिलेल्या टोप्या सर्वांनी घातल्या होत्या.
Web Title: Satara BJP MLA Shivendraraje Agitation Against Toll Free Protest at highway in MNS Style
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल