साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये | तरी भाजपमध्ये राजकीय अस्वस्थता?
सातारा, १८ ऑक्टोबर : राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते भेटले की चर्चांना उधाण येते. असेच काहीसे उधाण पुन्हा एकदा आले होते. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती. त्यानंतर वृत्त पसरताच अजित पवारांनी भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण दिलं होतं.
मात्र त्यांच्या या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरु असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र ती भेट नेमकी कशासाठी आहे, याचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात साताऱ्यातील दोन राजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्षातअसले भाजपमधील अस्वस्थता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असणाऱ्या मित्रत्त्वात सातत्याने भर पडत आहे. त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी वाढत असलेली सलगी भाजपला खटकणारी असली तरीही काही बोलता येत नाही, अशी भाजपची अवस्था झाली आहे.
उदयनराजे भोसले यांच्यामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल, केवळ साताराच नव्हे तर राज्यात त्यांचा फायदा मिळेल, असा भाजपचा कयास फोल ठरला आहे. मुळात उदयनराजे नेहमीच पक्षापेक्षा लोकांना आणि व्यक्तिगत संपर्काला महत्त्व देतात. त्यामुळे भाजपला अपेक्षित असे काहीच घडत नसल्यामुळे दोन्ही राजांच्या भूमिकेमुळे भाजप हतबल होत चालला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व स्थापनेपासून कायम आहे. त्याउलट भाजपची स्वतःची ताकद नाही. पक्षातील मूळ कार्यकर्त्यांपेक्षा पक्षामध्ये आलेली ताकदवान नेतेमंडळी हीच पक्षाची ताकद राहिली आहे. एक आमदार तर दुसरे राज्यसभेचे खासदार असले तरी आता सातारा शहर व तालुक्यावर भाजपची पकड आहे, असे कागदावर म्हणता येईल. निवडणुकीपूर्वी भाजपला आलेला फुगवटा पुढे टिकला नाही असंच म्हणावं लागेल.
News English Summary: In the stronghold of NCP, two kings from Satara, MP Udayan Raje Bhosale and MLA Shivendra Singh Raje Bhosale are in the Bharatiya Janata Party. Shivendra Singh Raje Bhosale’s friendship with Deputy Chief Minister Ajit Pawar is constantly increasing. Even though his growing closeness with the NCP is bothering the BJP, the BJP is in a dilemma.
News English Title: Satara BJP Political fact MP Udayanraje Bhonsale and MLA Shivendraraje News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO