5 November 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद; राऊत आणि आव्हाडांचा निषेध

Shivsena MP Sanjay Raur, Chhatrapati Udayanraje Bhonsale, MP Chhatrapati Sambhajiraje

सातारा : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावा द्या, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले होते. त्यामुळे उदयनराजेंचे समर्थक संतप्त झाले.

साताऱ्यात बाजारपेठ आणि ठिकठिकाणची दुकानं बंद ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले. उदयनराजेंच्या समर्थकांनी राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

तर उदयनराजेंसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पाट्या टांगून निषेध व्यक्त करण्यात आला. सातारच्या बाजारपेठेतल्या नेहमीच्या गजबलेल्या ठिकाणी आज शांतता पाहायला मिळाली. सोलापूर, सांगली आणि नगरमध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे. साताऱ्यात पोवई नाका चौकात गाढवांची धिंड काढून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांचे निषेध आंदोलन सुरू आहे.

 

Web Title:  Satara closed announced by Chhatrapati Udayanraje Bhonsale Supporters after Shivsena MP Sanjay Raut comment.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x