24 November 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मोदी, शहांचं गोड कौतुक करत उदयनराजे अखेर भाजपमध्ये

MP Udayanraje bhosale, BJP President Amit Shah, Central Home Minister Amit Shah, Assembly Election 2019

नवी दिल्ली: उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. त्यांनी यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.

नवी दिल्लीत उदयनराजेंच्या प्रवेशाचा खास सोहळा पार पडला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे यावेळी उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी मोदी व शहांची तोंडभरून स्तुती केली. ‘देश एकत्र, एकसंध व मजबूत कसा राहील, यासाठी मोदी व शहा हे काम करत आहेत. त्यांच्या कामामुळं देशातील प्रत्येक राज्यात भाजपची वाढ होतेय. लोक या पक्षात येऊ इच्छित आहेत,’ असं उदयनराजे म्हणाले. काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केलं. ‘यापुढं मी मोदी, शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपमधील माझ्या सहकाऱ्यांच्या साथीनं समाजासाठी काम करेन,’ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. साता-यात उदयनराजेप्रेमींनी घेतलेल्या मेळाव्यात राजेंनी भाजपामध्ये जावे, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. उदयनराजेंनी मात्र भाजपा प्रवेशाबाबत कोणतेच जाहीर वक्तव्य केले नव्हते. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साता-यात येऊन उदयनराजेंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x