कलानगर उड्डाणपुल दुसऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | विरोधी पक्षनेते फडणवीसांना वगळले
मुंबई, २८ जून | वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वांद्रे- कलानगर जंक्शन येथे उभारलेल्या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिकांपैकी दुसरी मार्गिका आज (सोमवार) खुली केली जाणार आहे. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मालाड येथे दोन हजार रुग्णांच्या क्षमतेचे करोना केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह विविध खात्याचे मंत्री, अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. यावरून मनापमानाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीही डावलले:
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध एकेकाळी चांगले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सातत्याने टीका करत आहेत. ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील संबंधात कटुता आली आहे. त्यामुळे फडणवीस यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही अनेक कार्यक्रमातून फडणवीस यांना वगळण्यात आले होते. मार्च महिन्यात झालेल्या वांद्रेतील सायकल ट्रॅक, वरळी – शिवडी मार्गाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकारने डावलले होते. दरम्यान, परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी काढता पाय घेतला होता. आताही सरकारने फडणवीस यांना डावलल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मार्गिका होणार खुली:
कलानगर जंक्शन येथे तीन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे काम २०१७ पासून सुरू झाले. यापैकी वांद्रे – कुर्ला संकुलाकडून वांद्रे – वरळी सागरी मार्गाकडे जाणारी ६०४.१० मीटर लांबीची दोन पदरी मार्गिका फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली. दुसऱ्या मार्गिकेचे काम अपूर्ण असल्याने त्यावेळी त्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या. आता हे काम पूर्ण झाले असून वांद्रे – वरळी सागरी मार्गाकडून वांद्रे – कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. ही मार्गिका ७१४.४० मीटर लांबीची आहे. नरीमन पॉईंट, दक्षिण मुंबईतून वांद्रे- कुर्ला संकुलात येणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत १० मिनिटांची बचत होणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Second lane of Mumbai Bandra Kalanagar flyover will be inaugurated by CM Uddhav Thackeray today news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा