5 November 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

माजी आमदार पडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश माझ्या आदेशानेच | खडसेंचं वक्तव्य

Senior BJP Leader Eknath Khadse, Udaysingh Padvi, NCP Entry

मुंबई, १२ ऑक्टोबर : माजी आमदार उदयसिंह पडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो माझ्या आदेशावरुनच असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उदयसिंह पडवी यांनी मला विचारलं होतं की कोणत्या पक्षात प्रवेश करु तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपाला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

जळगावातल्या एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. खानदेशातील अनेक आमदार माझ्या सोबत आहेत. मग ते देखील राष्ट्रवादीत जाणार का? असा प्रश्न एकनाथ खडसेंना विचारला असता मीच अजून राष्ट्रवादीत गेलो नाही तर त्यांच्या प्रवेशावर मी काय बोलू? असं सूचक वक्तव्य खडसेंनी केलं आहे. तसंच मी अजूनही भाजपात आहे हे सांगायलाही खडसे विसरलेले नाहीत.

 

News English Summary: Former MLA Uday Singh Padvi joined the NCP. It is on my orders that BJP leader Eknath Khadse made such a secret statement. His statement has caused a stir in political circles. When Uday Singh Padvi asked me which party to join, I told him to join the NCP, explained Eknath Khadse. Eknath Khadse has given an indirect warning to the BJP saying that many colleagues are believing in me.

News English Title: Senior BJP Leader Eknath Khadse Reaction On Udaysinh Padvi NCP Entry Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x